IMD weather update: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भासह मराठवाड्यात पाऊसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
देशात पुन्हा एकदा पाऊसासाठी पोषक असं वातावरण निर्माण होत आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशातील उत्तरे कडील काही राज्यात पाऊस आणि गारपीट होऊ शकते. तसंच हिमवृष्टीचीही श्यक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण वगळता येत्या 48 तासात म्हणजेच 25 आणि 26 तारखेला विदर्भ मराठवाडयातील काही जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यातील काही भागात पाऊसाचा अंदाज आहे. या पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ शकते यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेतली पाहिजे.