पावसाअभावी मका पीक वाळून गेल्याने शेतकरी संतप्त...
पावसाअभावी मका पीक वाळून गेल्याने शेतकरी संतप्त; उभे पिक उपटून फेकले;
पावसाआभावी मका पीक वाळून गेल्याने संतप्त होत सिन्नर तालुक्यातील पांचाळे येथील शेतकऱ्यांनी उभे मका पिक उपटून फेकून देत जनावरांना देखील खाऊ घातले आहे. पावसाविना सिन्नर तालुक्यामध्ये अनेक गावात पेरण्याच झालेल्या नाही.गेल्या दीड ते दोन महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने अक्षरशः पेरलेले पीक उगले मात्र पावसाविना पीक पूर्णपणे वाळून गेल्याने मोठ्या नुकसानीला सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. पहा मका उत्पादक शेतकरी कमलाकर बिलोटे आणि अक्षय बिलोटे यांच्या भावना...