Monsoon2023 पड रे पाण्या, पड रे पाण्या..
तब्बल एक महिना उशिराने नैऋत्य मोसमी (Monsoon 2023)वाऱ्यांचं आगमन कोकणपट्टीसह महाराष्ट्रात झालं आहे.. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद असून १९८३ साली र.वा. दिघे यांनी लिहिलेलं आणि प्रल्हाद शिंदे यांच्या स्वर्गीय आवाजाने अजरामर झालेलं शेतकरी आणि पाऊस यांचं हृद्य नातं उलगडून दाखवणारं अप्रतिम गीत.. खास MaxKisan च्या प्रेक्षकांसाठी ❤️

पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी.
बघ नांगरलं नांगरलं, कुळवून वज केली,
सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली...
तापली धरणी, पोळले चरणी मी अनवाणी,
पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
निढळावर हात ठेवून वाट मी किती पाहू?
खिंडीतोंडी हटवाद्या नको उभा राहू!!
वरड वरड वरडिती, रानी मोरमोरिनीं
पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
पाण्या पड तू, मिरगाआधी रोहिणीचा,
पाळणा रे लागे भावाआधी बहिनिचा!!
आला वळीव खिंडीतोंडी शिवार झोडीत
जाईच्या ग झाडाखाली धनी पाभर सोडित.
पड रे पाण्या, पड रे पाण्या, भिजवि जमिनी
जेवण घेऊन शेतावरी चालली कामिनी!!!
- र. वा. दिघे