पावसामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
कापूस वेचणीला आला आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान होत आहे. उत्पन्नात देखील घट होणार आहे, पाऊस नव्हता तेव्हाही शेतकरी अडचणीत सापडला होता आणि आता पाऊस आहे तरी शेतकरी संकटात सापडला आहे.
चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्या पासून सुरू असलेल्या पावसामुळे कापसाच्या पिकाच नुकसान होत आहे. कापूस आता वेचणीला आला आहे आणि पाऊस सुरू असल्याने फुटलेला कापूस खराब होऊ लागला आहे. ज्यावेळेस पावसाची आवश्यकता होती त्यावेळेस पाऊस झाला नाही आणि आता कापूस वेचणीला आला आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान होत आहे. उत्पन्नात देखील घट होणार आहे, पाऊस नव्हता तेव्हाही शेतकरी अडचणीत सापडला होता आणि आता पाऊस आहे तरी शेतकरी संकटात सापडला आहे.