13 जून पासून राज्यभर पाऊस : या जिल्ह्याना Yellow अलर्ट
भारतीय हवामान खात्याचा IMD अंदाज..;
तळ कोकणातच तळ ठोकून बसलेल्या नैऋत्य मान्सून पुढे सरकला आहे. यामुळे रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूरपर्यंत आला आहे.
मध्य प्रदेश पासून तर बंगाल पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत म्हणजे उद्या 9 आणि 10 जून पर्यंत मुंबई व त्यानंतर अवघ्या एक ते दोन दिवसात महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलाय.
भारतीय हवामान विभागच्या IMD अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाजही वर्तविला आहे. तसंच पुढील पाच दिवस राज्यांना हवामान विभागानं अलर्टही जारी केलाय.
उत्तर – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात या जिल्ह्यांना यलो अलर्ट-
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
राज्यात महिनाभर पाऊस -
भारतीय हवामान विभागाने IMD पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. 6 जून ते 13 जून, 13 जून ते 20 जून, 20 जून ते 27 जून आणि 27 जून ते 4 जुलै अशा चार आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.