स्ट्रॉबेरी विक्रीतून लाखोंचं उत्पन्न ,आदिवासी शेतकऱ्याचा एक निर्णय ठरला गेमचेंजर ...
महाराष्ट्रातील शेतकरी आता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करु लागले आहेत. अनियमित पाऊस आणि शेतीला योग्य न मिळणारा भाव या परिस्थीत सुध्दा अदिवासी शेतकऱ्याने मोठा निर्णय घेऊन जणु काही शेतकरी वर्गासाठी एक आदर्शच ठेवला आहे.
असाच एक प्रयोग पुण्यापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे गावातील काठेवाडी येथील आदिवासी शेतकरी रमेश बांगर यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा पहिल्यांदा प्रयोग केला आणि यश मिळवलं आहे. बांगर यांना पहिल्याचं प्रयत्नात यश मिळालं असून २ लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची त्यांना आशा आहे. रमेश बांगर हे शेतात भात लावुन केवळ चार हजार रुपयांच उत्पन्न मिळवायचे रमेश बांगर यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केल्यानंतर चित्र बदललं आहे. त्यांनी १४ गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. यातून मिळालेल्या स्ट्रॉबेरीच्या विक्रीतून त्यांना गेल्या १२ दिवसात ३० हजार रुपये मिळाले आहेत.
स्ट्रॉबेरी लागवड करण्यापूर्वी ते इतरांच्या शेतात भात कापणीसाठी शेतमजूर म्हणून जात होते. त्यांना प्रतिदिन ३०० रुपये मिळायचे. रमेश बांगर यांच्यासाठी स्ट्रॉबेरीची लागवड जीवन बदलून टाकणारा निर्णय ठरला. या निर्णयात त्यांच्य़ा कु़टुंबीयांच मोठा वाटा आहे अस ही ते म्हणतात.
अनेक शेतकरी रमेश यांच्या शेताला भेट देतात आणि स्ट्रॉबेरी विकत घेऊन जातात.
जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील डोंगरी भागातील वातावरण हे स्ट्रॉबेरी शेतीसाठी अनुकूल आहे, असं म्हटलं.