भाजपच्या पोस्टर मध्ये आंदोलक शेतकऱ्याच्या फोटोचा गैरवापर

गेली सत्तावीस दिवस दिल्लीच्या सिंघुबॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या हरप्रीत शेतकऱ्याचा फोटोच कृषी कायदा समर्थनासाठी भाजपच्या पोस्टरवर यावेळी वापरण्यात आल्यानं शेतकरी आंदोलक संतापले अखेल आणि भाजप आणि आयटी सेलच्या विरोधात जोरदार मोहीम राबवल्यानंतर पक्षाने हे पोस्टर फेसबूक पेजवरून डिलिट करून टाकले. आता हरप्रीत भाजपला कायदेशीर नोटीस बजावणार आहेत.

Update: 2020-12-23 06:22 GMT

केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात बळीराजा चांगलाच संतापला असून हा कायदा रद्द करावा यासाठी म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे कूच करणाऱ्या पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांनी राज्यांच्या सीमांवरच रोखून धरले आहे. कडाक्याच्या थंडीतही शेतकरी वर्ग तिथेचे ठाण मांडून बसला आहे.

अशातच भाजपने पंजाबमधील शेतकरी या कायद्यांवरून खूष असल्याचे एक पोस्टर प्रसिद्ध केले. गंभीर बाब म्हणजे या आंदोलनात सहभागी असलेल्या एका शेतकऱ्याचाच फोटोच कृषी कायदा समर्थनासाठी भाजपच्या पोस्टरवर यावेळी वापरण्यात आला. यामुळे शेतकरी आंदोलक संतापले अखेल आणि भाजप आणि आयटी सेलच्या विरोधात जोरदार मोहीम राबवल्यानंतर पक्षाने हे पोस्टर फेसबूक पेजवरून डिलिट करून टाकले.

हरप्रीत यांनी भाजपला लीगल नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान, शेतकरी आंदोलनाची दिशा बदलण्याचे प्रयत्न सरकारच्या समर्थकांकडून सुरू आहे. सोशल मीडियावर हे आंदोलन म्हणजे खलिस्तानवाद्यांचे आंदोलन असल्याचे मेसेज काही लोकांनी फिरवले होते. मात्र आंदोलकांनी हे साफ खोटे असल्याचे सांगत मागण्यांवर दटून राहिले. त्यानंतर आता खूद्द पंजाब भाजपकडून एक पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले होते. ज्यामध्ये पंजाबमधील शेतकरी 'एमएसपी'वर खूश असल्याचे म्हटले होते. तसेच शेतकऱ्यांचा आनंदी चेहरा देखील यात लावण्यात आला होता. या शेतकऱ्याचे नाव हरप्रीत सिंह असे आहे.

मात्र हरप्रीत सिंह ज्याचा पोस्टरवर फोटो आहे तो स्वत: सिंघु बॉर्डरवर कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. हरप्रीत यांचा फोटो असलेले पोस्टर प्रसिद्ध होताच आंदोलक आणखी संतापले.खुद्द हरप्रीत म्हणाले की मी पहिल्या दिवसापासून या आंदोलनात उतरलो आहे. आणि माझाच काही वर्षांपूर्वीचा फोटो भाजपने आपल्या पोस्टर वर घेतला आहे. तसे करण्याआधी पक्षाकडून कोणती विचारपूस देखील करण्यात आलेली नाही. उलट मी स्वत: या आंदोलनात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर संतापाची लाट उसळल्यानंतर भाजपने हे ट्विट आपल्या अधिकृत हँडलवरून डिलिट केले.शेतकरी आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहे आणि जोपर्यंत कायदे मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करत राहू असा स्पष्ट इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपसाठी सर्वप्रयत्न करून देखील आंदोलकांना शांत करण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे.



Tags:    

Similar News