शेतकरी लागला पेरणीपूर्व तयारीला..
पेरणीसाठी केवळ मान्सूनची वाट पाहिली जात नाही तर मान्सून येण्याआधीच राज्यातील अनेक भागात पेरणी करण्यात येते ती नेमकी कशासाठी आणि काय आहे त्या मागचं शास्त्र हे सांगणारा रिपोर्ट...;
आता उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा असल्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीपूर्व तयारीमध्ये व्यस्त दिसत आहेत. त्यामध्ये बैल जोडी तसेच ट्रॅक्टरद्वारे नांगरणी वखरणी केली जात आहे. पावसाच्या आधी नांगरणी वखरणी केल्यामुळे जमिनीची धूप ही कमी होते आणि पीक सुद्धा चांगले येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे पाऊस आल्यानंतरही आणखी एकदा नांगरणी वखरणी केली जाते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि पीकही चांगले येते, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.