शेतकऱ्याने लंपी रोगावर शोधला उपाय
लंपी आजारामुळे शेतकरी चिंताग्रस्त असताना सोलापूर जिह्यातील सांगोला तालुक्यातील महुद या गावातील शेतकऱ्याने गायीसाठी पीपीई किट बनवले आहे. काय आहे या शेतकऱ्याचा प्रयोग पहा या व्हिडिओतून..;
जनावरांत आढळणारा लंपी रोग राज्यात गेल्या अनेक दिवसापासून थैमान घालत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या रोगाला राज्यातील अनेक जनावरे देखील बळी पडली आहेत. त्यामुळे आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आले होते. परंतु सोलापूर जिह्यातील सांगोला तालुक्यातील महुद येथील शेतकरी जितेंद्र बाजारे यांनी यावर उपाय शोधला आहे. त्यांनी लंपी रोगावर उपाय शोधला आहे. शेतकऱ्याने कोणता उपाय शोधला आहे. जाणून घेवूयात या रिपोर्ट मधून..