धक्कादायक : तिबार पेरणीच्या संकटाने शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
आऱोप – प्रत्यारोप, सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न...या दरम्यान सामान्यांचे काय हाल होत आहेत, याची माहिती तरी सरकारला आहे का......बुलडाणा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने व्यवस्था आता तरी हादरणार आहेत का....;
बुलढाणा : आर्थिक अडचण आणि दुबार पेरणी करूनही पावसाअभावी पीक उगवले नाही, एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. आर्थिक संकट ओढवलेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील कारखेड या गावात घडली आहे. या दाम्पत्याने 7 जुलै रोजी रात्री आपल्या राहत्या घरी विष घेतले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारा दरम्यान शेतकऱ्याच्या पत्नीाचा 8 जुलै रोजी रात्री तर शेतकऱ्याच्या 9 जुलैला सकाळी मृत्यूच झाला.
60 वर्षीय शेषराव मंजुळकार आणि 51 वर्षीय जनाबाई मंजुळकार अशी आत्मरहत्या केलेल्या दाम्प्त्याीची नावे आहेत. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती. यावर्षी पाऊस पडल्यावर त्यांनी पेरणी केली. मात्र बियाणे उगवलेच नाही, त्यामुळे त्यांनी शेतात दुसऱ्यांदा पेरणी केली, ते उगवलेले असताना ही पावसाअभावी पीक करपून गेले. आता तिसऱ्यांदा पेरणी करायची तर त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. दोनवेळा पेरणी केली तेव्हा जवळचे पैसे खर्च झाले आणि तिसऱ्यांदा पेरणी कशी करायची या विवंचनेतच खचल्याने दोघांनी विष घेतले होते. त्यां च्याावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे.
या कुटुंबाची दोन एकर शेती असून, त्यांना दोन मुले तसेच चार मुली आहेत. या सर्वांची लग्न झालेली आहेत.. मंजुळकार दाम्पत्य हे त्यांच्या शेतीसोबतच परिसरात दगड फोडणे आणि मजुरी करण्याचा व्यवसाय होता. यावरच त्यांचा प्रपंच चालायचा. शिवाय पत्नी जनाबाई याना अर्धांगवायूचा त्रास झाला होता. या सर्व प्रकारामुळे दोघेही चिंताग्रस्त होते.