कांदा आणि द्राक्ष पंढरीची सुरक्षा धोक्यात ?

द्राक्षाची (Grapes) पंढरी म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत (pimpalgaon baswant) येथे द्राक्ष काढण्याचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची पिंपळगाव बसवंत येथे आर्थिक व्यवहारासाठी वाढलेली वर्दळ तसेच पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतच्या वतीने सुरक्षेच्या (Security) दृष्टिकोनातून जवळपास 50 च्या आसपास शहरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवले होते. सद्यस्थितीत ते बंद अवस्थेत असल्याने ते कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.;

Update: 2023-04-05 13:19 GMT

द्राक्षाची (Grapes) पंढरी म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत (pimpalgaon baswant) येथे द्राक्ष काढण्याचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची पिंपळगाव बसवंत येथे आर्थिक व्यवहारासाठी वाढलेली वर्दळ तसेच पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतच्या वतीने सुरक्षेच्या (Security) दृष्टिकोनातून जवळपास 50 च्या आसपास शहरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवले होते. सद्यस्थितीत ते बंद अवस्थेत असल्याने ते कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Full View

निफाड (Niphad) तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ही द्राक्षाची तसेच कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी अनेक मोठ्या बँक देखील असून कोट्यावधीची उलाढाल या पिंपळगाव बसवंत गावात होत असल्याने या गावात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद अवस्थेत असल्याने ते सुरू करावे. अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने होत असून याबाबत सरपंच यांनी ठेकेदाराला बोलवून बंद असलेले कॅमेरे चालू करावे, असे आदेश देखील दिले आहेत. मध्यंतरीच्या काळात दुसरी सत्ता असल्याने या कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे सरपंचांनी सांगितले आहे. तरी 50% सीसीटीव्ही कॅमेरे चालू असून उरलेले कॅमेरे लवकरात लवकर सुरू होतील असे आदेश दिले आहेत,या द्राक्ष पंढरीचे नागरीक दिगंबर लोहिते आणि सरपंच भास्कर बनकर यांनी व्यक्त केलेल्या भावना...


Tags:    

Similar News