कांद्यावरील निर्यात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरातील बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मोठ्या प्रमाणावर कांदा मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांची गर्दी होत असते मात्र लिलाव बंद असल्याने शेतकरीच फिरकले नसल्याने कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
कांदा निर्यातीवर 40% कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे कांद्याची निर्यात बंद होऊन दर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी राज्यभरातील बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांद्याचा लिलाव होतl असतो, मात्र या ठिकाणी कांदा लिलाव बंद करण्यात आल्याने शेतकरीच फिरकले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यामुळे कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत असून धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती दररोज दीड ते 2000 क्विंटल कांद्याची आवक होत असते. अशी माहिती धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी यांनी दिली.