कांद्याचा भाव पडला, शेतक-यानं उभ्या पिकावर नांगर फिरवला

मेहनतीनं पिकवलेल्या कांद्याला सध्या बाजारात कवडीमोल भाव मिळतोय. त्यातून उत्पादनचा खर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातल्या संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पिंपरने (Pimparne) गावच्या धनंजय थोरात (Dhananjay Thorat) या कांदा उत्पादक शेतक-याने ४ एकरातील कांद्याच्या पिकावर अक्षरशः ट्रॅक्टर (Tractor) फिरवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Update: 2023-02-26 11:24 GMT

धनंजय थोरात यांनी चार एकर शेतात सुमारे दोन (2 Lakh ) लाख रूपये खर्चून कांदा (Onion) लागवड केली होती. कांदा काढून बाजारात विकण्याची वेळ आली असतांना अचानक कांद्याचे भाव कोसळले. त्यामुळं हवालदिल झालेल्या धनंजय थोरात यांनी कांदा पिकावर ट्रॅक्टरच फिरवला. कुणीही या मोफत कांदा उपटून घेऊन जा, रान मोकळं करून द्या, असे म्हणण्याची वेळ कांदा उत्पादक शेतक-यांवर आली आहे. त्यामुळं थोरात यांच्या शेतात कांद्याची पात खाण्यासाठी शेळी, बक-या आणि मेंढ्यांची गर्दी होते आहे. कांदा घरी नेण्यासाठी लोकांनी थोरात यांच्या शेतात गर्दी केली होती. इतरवेळी गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणा-या कांदयानं यावेळी मात्र कांदा उत्पादक शेतक-यांच्याच डोळ्यात पाणी आणलंय.

25/02/23 तारखेचे बाजारभाव





Tags:    

Similar News