कांदा महागणार
येत्या दोन ते तीन महिने कांद्याच्या दरामध्ये वाढ होणार; कांदा व्यापाऱ्यांची माहिती
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव वाढतच आहेत. पुरेसा पाऊस नसल्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे ,आणि त्यामुळे भाववाढ होत असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अवकाळी पावसाचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या एपीएमसी बाजारामध्ये 40 रुपये किलोने कांदा विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात देखील भाव चढतेच आहेत. मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाल्याने वाया गेला आहे आणि त्यामुळे आवक कमी झाली आणि भाववाढ झाली आहे. येत्या दोन ते तीन महिने कांद्याच्या दरामध्ये वाढ होणार असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.