कांद्याला भाव मिळेल या अपेक्षेने सहा महिन्यापासून कांदा साठवणूक; शेतकरी चिंतेत

Update: 2023-08-30 02:30 GMT

कांद्याला ( onion) भाव नसल्याने भाव वाढ होईल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे साठवणूक केली. परंतु कांद्याला भाव नाही आतापर्यंत या सहा महिन्यांमध्ये 20% कांदा हा खराब होऊन फेकण्यात आला आहे. आणि आता देखील काही कांदा खराब होत आहे, काहींना कांद्याची पात वर आलेली आहे त्यात केंद्र सरकारने निर्यात वरती 40% कर आकारण्याचे निर्णय घेतल्यानंतर राज्यभरामध्ये त्याचा पडसाद उमटले. आणि राज्यातील कृषी मंत्री यांनी केंद्रात जाऊन नाफेडच्या माध्यमातून 2410 रुपये भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे घोषणा केली. परंतु त्या नाफेड केंद्रामार्फत कांदा खरेदी करण्यासाठी लावलेल्या निकष आणि राज्यामध्ये नाफेडचे केंद्र किती खरेदी करेल याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक ना अनेक प्रश्न सरकार बद्दल निर्माण होत आहे. सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे की शेतकऱ्यांना आत्महत्यास प्रवृत्त करण्यासाठी असा संताप जनक प्रश्न सरकारला कांदा उत्पादक शेतकरी नारायण पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. नाफेड केंद्राच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यासाठी लावलेल्या निकषामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असे शेतकरी नारायण पाटील यांनी व्यक्त केले.


Tags:    

Similar News