कांदा लिलाव सुरू झाले खरे परंतु शेतकरी नाराज
कांदा व्यापाऱ्यांकडून लिलाव पूर्ववत सुरू; मिळणाऱ्या भावात शेतकरी समाधानी नाही
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी १३ दिवसांपासून पुकारलेला संप जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकी नंतर मागे घेतला. पालकमंत्री दादा भुसे व केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अखेर तोडगा काढल्याने तब्बल १३ दिवसांनंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले आहे. यावेळी जास्तीजास्त 2352 रुपये, कमीतकमी 1000 रुपये तर सर्वसाधारण 2050 रुपये मिळाला प्रति क्विंटलला दर मिळाला आहे. मात्र, मिळणाऱ्या भावात शेतकरी समाधानी नसून पुढे दिवाळी सण येऊ ठेपला असल्याने सण कसा साजरा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहेत. पहा शेतकरी संतोष सरडे यांची प्रतिक्रिया...