सलग चौथ्या दिवशीही कांदा लिलाव बंद
कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांमुळे सलग चार दिवस कांदा लिलाव बंद असून कांदा उत्पादकांचे नुकसान होत आहे;
शेतकरी हिताचे कारण सांगत नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याकरता लिलाव बंद ठेवला असून, आज देखील बंदचा तिसरा दिवस असून पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे बैठक पार पाडण्यात आली. मात्र त्यात कोणताही तोडता निघाला नसल्याने पुन्हा नाशिक कांदा असोसिएशनची बैठक होणार असून मागण्यांबाबत चर्चा देखील होणार आहे, असे कांदा व्यापारी नंदकुमार अट्टल यांनी सांगितले.