पूर्वी दूरदर्शनवर एक जाहिरात यायची त्यामध्ये म्हटलं जायचं की अमूल दूध पीत आहे इंडिया.. पण ज्या पद्धतीने दूध उत्पादनाच्या आकडे येत आणि प्रत्यक्षात वितरण होते भेसळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि भेसळ रोखण्यासाठी शासन कुठलेही प्रामाणिक प्रयत्न करत नाही.. आता तर दूध नाही जहर पीता है इंडिया अशा पद्धतीची जाहिरात करायला पाहिजे अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत दूध भेसळीवर प्रहार केले...