आमचं ठरलंय, यापुढे कांदा निर्यातबंदी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याच राजकीय नेत्यांना आता उपर्ती आली आहे;

Update: 2024-08-10 09:40 GMT

शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याच राजकीय नेत्यांना आता उपर्ती आली आहे. यात खास करून नासिक पट्ट्यातील कांदा निर्यातबंदीचा मुद्दा चांगलाच महायुतीला च्या अंगलट आला होता. शेतकऱ्यांनी वारंवार कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी आंदोलन केली मात्र याकडे साफ दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी निवडणुकीत मातपेटीतून आपला संताप दाखवून दीला.

 

कांदा निर्यात बंदीचा मुद्दा पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल कांदयाच आगार असलेल्या नासिक जिल्ह्यातील निफाड मध्ये झालेल्या जाहीर सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफीच मागावी लागली.

कांदा निर्यातबंद केल्याने शेतकऱ्यांच् मोठं नुकसान झालं निर्यात बंदी ही मोठी चूकच होती, अशी कबुली देत शेतकऱ्यांची मी हात जोडून जाहीर माफी मागतो अस म्हणत केंद्र सरकारला दिल्लीत जाऊन याबाबत आपण सांगितलं आहे की यापुढे कांदा निर्यात बंदी होणार नाही महायुतीच एकमत झालं अस ही अजित पवार यांना यावेळी आवर्जून सांगावं लागलं.

 

लोकसभा निवडणुकीत नाशिकसह दिंडोरी, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी आणि सोलापूर या सात मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना कांदा उत्पादकांच्या नाराजीचा फटका बसला. राज्यातील ४८ पैकी अवघ्या १७ जागा त्यांना जिंकता आल्या. त्यामुळे देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र कांदा चे प्रश्न अजूनही तसेच आहेत हे प्रश्नांची सोडवणूक केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी नेमका मतपेटीत काय टाकतो हेही महत्वाचं आहे.

Tags:    

Similar News