निफाडमध्ये शेतकरी चौफेर संकटात

Update: 2023-08-08 14:15 GMT

उशिराचा पाऊस उशिराच्या पेरण्या आणि दुबार पेरणी करून देखील पीक करपू लागल्याने नाशिक जिल्ह्यातील निफाड मधील शेतकरी संकटात सापडले आहेत...

Full View

निफाड तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र यावर्षी पावसाने दडी मारली असून अक्षरशः शेतकऱ्यांनी पेरलेले पीक देखील धोक्यात आले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अल्प पावसावर पेरण्या केल्या त्या उगवल्या देखील मात्र पावसाने दडी मारल्याने अक्षरशः पेरलेले पीक हे जळून खाक झालं, त्यानंतर शेतकऱ्यांनी परत दुबार पेरण्या केल्या दुबार पेरणी करून देखील पावसाने हुलकावनी दिल्याने अक्षरशः सोयाबीन सह इतर पिक करपू लागल्याची परिस्थिती निफाड तालुक्यात दिसत असल्याचे स्थानिक शेतकरी विजय पानगव्हाणे सांगतात..

Tags:    

Similar News