राज्यात पुन्हा पुढील पाच दिवस पाऊस: हवामान खात्याचा अंदाज

राज्यातील काही भागात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट चा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार २ ते ६ मेपर्यंत पाऊस हाेणार आहे. उत्तर महाराष्ट्र, कोंकण , पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातील काही भागात पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट उभं राहील आहे.

Update: 2023-05-03 06:04 GMT

गेल्या मार्च महिन्यापासून ठराविक अंतराने वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. एप्रिल महिन्यातही तीच परस्थिती राहिली एप्रिलच्या महिन्यात तर पावसाळ्यासारखा अतिवृष्टीच झाली यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता पुन्हा उन्हाळ्याच्या मे हिट च्या महिन्यात वादळी वारा आणि पाऊस होण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सूचना -

अहमदनगर जिल्ह्यातही पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.

शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा.

नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा.

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा.

Tags:    

Similar News