राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे
खरीप संकटात असताना पूर्वाश्रमीचे मंत्री अब्दुल सत्तार हे अकार्यक्षम असल्याचा आरोप झाल्यानंतर आता कृषी विभागाचे धुरा नवनियुक्त मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.;
शपथविधी होऊनही खातेवाटप होऊ न शकल्याने तर्कवितर्क वर्तवले जात होते परंतु गेल्या दोन दिवसात अनेक दिल्ली वाऱ्या झाल्यानंतर मंत्रिमंडळ खाते वाटपावर अंतिम मोहोर उमटवण्यात आली. अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाचा विरोध डावलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
माझी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कामाबद्दल सर्वसामान्यांमध्ये निराशा होती त्याचबरोबर त्यांच्यावर अनेक आरोप देखील करण्यात आले होते त्यामुळे पुनर्रचित मंत्रिमंडळामध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी विभाग काढून तो थेट तरुण तडफदार धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आला.
राज्यात तब्बल एक महिना उशिरा मान्सूनचे आगमन झाल्याने अजूनही पेरण्या झालेल्या नाहीये. अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी कीटकनाशके आणि खतांच्या दुकानावर धाडसत्र सुरू आहे.
नव्या शेती आव्हानांचा सामना करून धनंजय मुंडे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिलासा देता येते याकडे राज्यातील तमाम शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
नवनियुक्त कृषी मंत्र्यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आपला बळीराजा संकटाच्या छायेत असताना मी वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही.तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत कायमच आहेत. परंतू पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवत यावर्षीचा वाढदिवस मी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कृषीमंत्री म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे - कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.