महाराष्ट्र आणि ब्राझील दरम्यान सोयाबीन, कापूस, ऊस आदींच्या संशोधन व्यापारासंदर्भात झाली चर्चा

ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी ब्राझीलच्या शिष्टमंडळाने धनंजय मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण दिले आहे.;

Update: 2023-09-26 11:36 GMT

 ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी ब्राझीलच्या शिष्टमंडळाने धनंजय मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण दिले आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ब्राझीलच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादित होणारे सोयाबीन, वातावरण बदलावर व त्यानुसार शेतीमध्ये केलेले प्रयोग, त्याचे संशोधन, कमी पाण्यात उसाचे अधिकाधिक उत्पादन करणे तसेच बेदाणेची ब्राझीलमध्ये मोठी मागणी असल्याने त्यावरील आयात कर कमी करणे, ब्राझील या देशासोबत तेथील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या बाबी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विद्यापीठाचे संशोधक यांना ब्राझीलला पाठवण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. तसेच शिष्टमंडळाने मुंडे यांना नोव्हेंबर मध्ये ब्राझील देशाचे निमंत्रण दिले. याशिवाय दिल्लीमध्येही होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

या शिष्टमंडळात ब्राझील दूतावासाचे सचिव तथा व्यापार व गुंतवणूक विभागाचे प्रमुख वेगणर, भारतीय दुत्वासातील राजदूत केनेथ नोब्रेगा, कौन्सिल जनरल जोआओ मेंदोना, कृषी विभागाचे अँजिलो किरोज आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक शेती व त्यामध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगांविषयी माहिती दिली तसेच राज्यातील कृषी क्षेत्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबाबतही माहिती दिली.


Tags:    

Similar News