सहाय्यक निबंधकाच्या आदेशाला शेतकऱ्यांचे चॅलेंज...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वसुलीमुळे अनेक शेतकऱ्यांचा सातबारा वरील भोगवटा अधिकार निघून चालला असून सहायक निबंधकाच्या या आदेशाविरुद्ध सरकारने त्वरित पावले उचलून त्याला स्थगिती द्यावी
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वसुलीमुळे अनेक शेतकऱ्यांचा सातबारा वरील भोगवटा अधिकार निघून चालला असून सहायक निबंधकाच्या या आदेशाविरुद्ध सरकारने त्वरित पावले उचलून त्याला स्थगिती द्यावी. यासह इतर शेतमाल बाजार भाव मागणी करता १५ जून रोजी नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे शेतकरी पत प्रतिष्ठा संरक्षण पंचायत भरवणार, असल्याची माहिती शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जिल्हा सहकारी बँक व कांदा व इतर शेतमाल भावाच्या प्रश्नामुळे नाशिक जिल्ह्यावर मोठे संकट ओढावलेले आहे. जिल्हा बँकेच्या वतीने कर्ज वसुलीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भोगवटा लागत असल्याने आतापर्यंत पंधराशे दोन हजार शेतकऱ्यांचा भोगवटा केला असून 65 हजार शेतकरी अजून प्रतिक्षेत असल्याने हे सर्व थांबावे. याकरता शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी पत प्रतिष्ठा संरक्षण पंचायत भरवण्यात येणार आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ही पंचायत सुरूच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी सांगितले आहे.