चोपडा तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारलेली आहे. पाऊस नसल्याने आणि तापणाऱ्या उन्हाने मूगा.च्या शेंगा सुकू लागल्या आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग मूग काढण्यात मग्न झाला आहे मुगाच्या शेंगा कोरड्या झाल्या असल्याने पाऊस पडण्याच्या आधी शेतकरी मूग काढून बाजारात विक्रीला आणण्यासाठी व्यस्त दिसत आहे. यावर्षी पाऊस नसल्याने शेतातील पिकांची परिस्थिती बिकट आहे पाऊस असता तर मुगाचे उत्पन्न देखील बऱ्यापैकी आले असते काहीतरी खर्च निघाला असता परंतु पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.