शेतकऱ्यांना संघटीत करणं म्हणजे कुत्र्याला शेपुट सावरण्यासारखं : राजू शेट्टी
राज्यात पहिल्यांदाच स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून नांगरट साहित्य संमेलन होणार असूनस्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवार प्रतिष्ठान यांच्यामार्फत नांगरट साहित्य संमेलन कोल्हापूरात पार पडणार आहे.;
शेतकऱ्यांना (farmers) संघटीत करणं, म्हणजे कुत्र्याला शेपुट सावरण्या सारखे आहे. जगातल्या सर्व क्रांत्या (revolution) शेती चळवळीतून झाल्या आहेत. राज्यात पहिल्यांदाच स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून नांगरट साहित्य संमेलन होणार असूनस्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवार प्रतिष्ठान यांच्यामार्फत नांगरट साहित्य संमेलन कोल्हापूरात पार पडणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नांगरट साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहेत.
शेतकरी हा आयुष्यभर बैलासारखा राबत असतो, बैलामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये काही फरक नाही, असे राजू शेट्टी यावेळेस म्हणाले.५ जून ला कोल्हापूरला बैलपोळा साजरा केला जातो. त्याच्या आधल्या दिवशी ४ जून रोजी कोल्हापुरात भव्य एक दिवशीय साहित्य संमेलन होणार आहे. शेतकऱ्यांच्या आजच्या प्रश्नावर साहित्यिक, कलावंत, विचारवंत, यांच्यामध्ये सखोल विचारमंथन व्हावं, शेतकरी चळवळीला यातून कालसंगत दिशा मिळावी यासाठी हे संमेलन होणार आहे. शेतकऱ्यांना संघटीत करणं, म्हणजे कुत्र्याला शेपुट सावरण्या सारखे आहे. जगातल्या क्रांत्या ह्या घटनेच्या माध्यमातुन झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या गोठ्यातील बैल कमी झाले,आणि ट्रॅकटर आला, असेही माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शेवटी म्हणाले.