पपईला मोझॅकची बाधा
नंदुरबार जिल्ह्यात पपई पिकावर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव,उभ्या पपई बागांवर शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेटर
यावर्षी दुष्काळी परिस्थितीत मोठ्या मेहनतीने जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांनी पपई बागा जगवल्या.मात्र मोझ्याक व्हायरस मुळे जिल्ह्यात जवळपास 3 हजार हेक्टर क्षेत्रातील बागा प्रभावित झाल्या आहेत 3 महिन्यांत बागांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करून सुद्धा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांनी पपईच्या बागांवर रोटावेटर फिरवायला सुरवात केली आहे.
देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख असून नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रावर पपई ची लागवड करण्यात आली आहे.त्या पैकी 3 हजार पेक्षा अधिकच्या क्षेत्रावर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे.गेल्या तीन महिन्या पासून बागा वाचविण्यासाठी शेतकरी महागड्या फवारणी करत होते.मात्र उपयोग होत नसल्याने आता शेतकऱ्यांनी पपई बागांवर रोटावेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे .पपई लागवडीवर खर्च केलेला लाखो रुपयांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नंदुरबार जिल्ह्यात पपई संशोधन केंद्र सुरू करावे त्यासोबत मोझ्याक व्हायरस मुळे नुकसान झालेल्या पपई उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.