`मोर्फा` च्या पुढाकारातून रसायनमुक्त व सेंद्रिय दुध निर्मिती
सेंद्रिय व विषमुक्त तसेच पशुसंर्धन व दुग्ध विकास विभागा बाबतच्या ॲन्टोबायोटिक फ्री दुग्ध उत्पादन वाढविणे, A1 व A2 मिल्क दुधाबाबातचा फरक समजून ग्राहकांची फसवणूक थांबविणे. तसेच कायदेशीर नियम बनविणे, सेंद्रिय व विषमुक्त चिकन, अंडी निर्मितीबाबत नियम बनविणे आणि धोरणात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी जाहीर केलं आहे.;
सेंद्रिय व विषमुक्त तसेच पशुसंर्धन व दुग्ध विकास विभागा बाबतच्या ॲन्टोबायोटिक फ्री दुग्ध उत्पादन वाढविणे, A1 व A2 मिल्क दुधाबाबातचा फरक समजून ग्राहकांची फसवणूक थांबविणे. तसेच कायदेशीर नियम बनविणे, सेंद्रिय व विषमुक्त चिकन, अंडी निर्मितीबाबत नियम बनविणे आणि धोरणात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी जाहीर केलं आहे.
मुंबई येथे सेंद्रिय व विषमुक्त दुध निर्मिती टप्प्यातील प्रश्नाबाबत सविस्तर अभ्यास गटाची घोषणा करुन अहवाल शासनाला तात्काळ दाखल करण्याची सुचना पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ना. सुनिल केदार यांनी या बैठकीत केली. केदार यांनी त्रिमुर्ती डेअरी फार्म वाणेवाडी(ता. बारामती) येथिल १००० गाईंच्या गोठ्याला भेट दिल्यानंतर मोर्फा च्च्या पदाधिकारी व पशुपालकांच्या बैठकतही याबाबत आश्वासन दिले आहे.
महा अॉरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन (मोर्फा) च्या पुढाकारातून दि.11 रोजी मंत्रालयात पशुसवंर्धन व दुग्ध विकास मंत्र्यांच्या दालनात व विषमुक्त दुध निर्मिती व विकास या टप्प्यातील पशुसंवर्धन व दुग्ध विकासाच्या प्रश्नाबाबत उच्चस्तरिय बैठक पार पडली होती.
माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात मोर्फा सोबत बैठक पार पडली होती, त्यावेळी खा, पवार यांनी सेंद्रिय व विषमुक्त शेतीबाबतचे विषय मार्गी लावण्याची सुचना उपस्थित सर्व मंत्र्यांना केली होती. त्यानुसार पशुसंर्धन मंत्री ना. सुनिल केदार यांनी तात्काळ मोर्फा पदाधिकार्या सोबत बैठक घेतली..यावेळी मोर्फा चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, उपाध्यक्ष स्वाती शिगांडे, डॉ. रविंद्र सावंत, मोर्फा चे संचालक संजय देशमुख, कल्याण काटे, अमरजित जगताप, कैलास जाधव, डॉ. किशोर मठपती, बाळासाहेब घोरपडे, नितीन तावरे, महेश खुडे तसेच पशुसंर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सेंद्रिय व विषमुक्त तसेच पशुसंर्धन व दुग्ध विकास विभागा बाबतच्या ॲन्टोबायोटिक फ्री दुग्ध उत्पादन वाढविणे, A1 व A2 मिल्क दुधाबाबातचा फरक समजून ग्राहकांची फसवणूक थांबविणे. तसेच कायदेशीर नियम बनविणे, सेंद्रिय व विषमुक्त चिकन, अंडी निर्मितीबाबत नियम बनविणे, या सर्व विषया बाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी पशुसंर्धन व दुग्ध विकास मंत्री ना, सुनिल केदार यांनी अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणा बैठकीत केली. तसेच विषमुक्त व सेंद्रिय दुध निर्मितीसाठी 10, 20, 50 व 100 गोठ्यांची निर्मिती करण्याची मोर्फा च्या मागणीला मंत्री महोदय यांनी सहमती दर्शवली, या योजनांसाठी अभ्यास गटाच्या शिफारशी नुसार शासन निर्णय अमलात आणेल असे सुनील केदार यांनी सांगितले.
मोर्फा च्या वतीने महानंंद व आरेच्या मुंबई व पुण्यातील दुकानातून शेतकर्यांच्या विषमुक्त व सेंद्रिय दुध विक्री करण्याची मागणी केली ती मागणी केदार यांनी तात्काळ मान्य करुन तशी कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पशुपालकांना दुग्धविकास, पशु संवर्धन विभागाच्या विवीध योजना, लसीकरण व इतर मार्गदर्शन मिळणेसाठी लवकरात लवकर ॲप बनवावे अशा सुचना ना. केदार यांनी बैठकीत दिल्या.
" नविन पिढीला दुग्ध व्यवसायात आणण्यासाठी व उत्पादन होणारे दुध आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित निर्मिती करण्यासाठी तरुणांना मार्गदर्शनाची गरज आहे, यासाठी शासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत, असे त्रिमुर्ती डेअरीचे संचालक डॉ. रविंद्र सावंत म्हणाले.
" समाजाला सुरक्षित दुधाची निर्मिती करुन देणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या च्या दुधा मुळे लहान मुले , महीला यांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होत असल्याने. आता शासनाने सावध पावले टाकून विषमुक्त व सेंद्रिय दुध निर्मिती साठी पुढाकार घेतला तर पुढिल पीढी सुरक्षित राहणार आहे. त्या दृष्टीने हि बैठक अतिशय सकारात्मक झाली." असे मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी सांगितले.
बैठकीत झालेले निर्णय -
1. विषमुक्त व सेंद्रिय दुध निर्मितीसाठी आवश्यक असनार्या अडचणी व विभागाने करावयाचे काम याबाबत अभ्यासगट तात्काळ ऊभारण्याचे ठरले.
2. महानंद व आरेच्या जागा सेंद्रिय व विषमुक्त दुध विक्री साठी शेतकरी व शेतकरी बचत गटांना देण्याचा निर्णय.
3. पशुसंर्धन विभाग योजनांची माहिती शेतकऱ्यांना कळण्यासाठी ॲप बनवेल