राज्यात जुलै महिन्यात मान्सून चांगला सक्रिय झाल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलाय, जून पेक्षा जुलै महिन्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलाय.हवामानाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय, कोकणसह विदर्भात 'यलो अलर्ट' हवामान विभागाणे दिलाय,नागपूर, अकोला, अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वेग ३०-४० किमीपर्यंत प्रतितास विविध ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे.
राज्यात ५ ते ७ जुलै दरम्यान विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह होईल पाऊसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र सह खान्देशांत सहा दिवस हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे जुलै दरम्यान ढगाळ वातावरण राहणार, तसंच सोसाट्याच्या वाऱ्यासह विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये५ जुलैपर्यंत यलो अलर्टचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला.