Monsoon2023: मान्सून आता परतीच्या वाटेवर

आठवडाभर राज्यात मोठ्या पावसाची अपेक्षा नसून वीस दिवसात मान्सून आता परतीचा प्रवास सुरू करणार आहे. परतीचा मान्सूनचा पाऊस देखील ठराविक भागात पडणार असल्याने राज्यात आता गंभीर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती तयार झाली आहे.;

Update: 2023-08-24 10:05 GMT

हवामान तज्ञ आणि अभ्यासक विजय जायभाये यांनी आठवड्यासाठी जाहीर केलेला हवामानाचा अंदाज..

1

"राज्यात सध्या मध्य भागात स्थानिक तापमान वाढ होऊन मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र विदर्भ या भागात मध्यम सुरूपाचा स्थानिक पाऊस 24/25/26 ऑगस्ट या काळात पडेल.




 


2

राज्यात इतर ठिकाणी किरकोळ भागात मध्यम पाऊस होईल 4/ 5 सप्टेंबर पर्यंत राज्यात कुठेही खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही .

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️




 


मान्सून परतीच्या वाटेवर

3

दक्षिण पश्चिम मान्सूनचा काळ पुढील 20 दिवसात संपणार असून 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर मान्सून राजस्थान मधून माघारी फिरणार आहे.




 


4

मान्सून माघारीच्या काळात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन आणि iod पॉजिटीव्ह फेज कडे कलत असल्यामुळे तसेच mjo त्या काळात 2/3/4 फेज मध्ये आल्यावर दक्षिण भारतात पाऊस देतील.




 


5

परतीचा पाऊस सर्वत्र नसणार

राज्यात परतीचा पाऊस काही भागात पडेल काही भागात पाऊस कमीच राहील ऑक्टोबर मध्ये काही भागात पावसाची शक्यता राहील तो पाऊस सार्वत्रिक नसेल.




 


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

6.उत्तर महाराष्ट्र 24 ऑगस्ट

25/26 जळगाव धुळे नंदुरबार काही भागात  मध्यम  पाऊस होईल नाशिक अहमदनगर पश्चिमे कडील भागात मध्यम पाऊस होईल. इतर ठिकाणी सर्वत्र ढगाळ हवामान किरकोळ पाऊस होईल संभाजी नगर किरकोळ भागात  मध्यम पाऊस होईल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️




 


7.

कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात अधून मधून जोरदार पाऊस  होईल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️




 


8.मध्य महाराष्ट्र 24  ऑगस्ट

पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली मध्यम  पाऊस किरकोळ ठिकाणी पडेल तसेच  पुढील काही दिवस किरकोळ ठिकाणी  पाऊस होईल.

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️




 


9.मराठवाडा 24 ऑगस्ट

पुढील दोन दिवस पूर्व मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड धराशिव काही भागात मध्यम ते पाऊस तर काही भागात हलका मध्यम पाऊस होईल. 25/26/27 ऑगस्ट काही भागात मेघगरजने सह पाऊस होईल.




 


⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

10.विदर्भ  24  ऑगस्ट

आज पूर्व विदर्भ  नागपूर गोंदिया  वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला मध्यम पाऊस होईल 25/26/27 ऑगस्ट  मध्यम पाऊस होईल बुलढाना वाशीम सह विदर्भात पावसात पाऊस राहील मध्यम ते काही भागात जोरदार होईल.




 


Tags:    

Similar News