मान्सून लांबला; शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली
शेतकऱ्यांच्या नजरा या आकाशाकडे लागल्या असून पावसाळ्याचे पाणी केव्हा पडते आणि शेतीच्या कामाला केव्हा सुरुवात करतो अशा प्रतीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दांपत्य हरिश्चंद्र आणि प्रमिला चोपकर आहेत.
गोंदिया जिल्ह्यात मृग नक्षत्र लागून 10 ते 15 दिवसाचा कालावधी लोटला असून आताही उन्हाचा तडाखा कायम आहे . मात्र काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून शेतकरी सुद्धा आपल्या शेतीच्या कामासाठी लागलेला असल्याचे पाहावयास मिळते. शेतकरी यांनी आपल्या शेतात पहिल्यांदा धान पिकाच्या लागवटी पुर्वी नांगरणी करून ठेवलेली आहे. पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आणि आता शेतकऱ्यांच्या नजरा या आकाशाकडे लागल्या असून पावसाळ्याचे पाणी केव्हा पडते आणि शेतीच्या कामाला केव्हा सुरुवात करतो अशा प्रतीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दांपत्य हरिश्चंद्र आणि प्रमिला चोपकर आहेत.