Monsoon2023 चिंता नको ; मान्सूनची वारी पुढे सरकली...

मान्सूनने अखेर आज पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. एकाच जागेवर तब्बल सहा दिवस मुक्काम केल्यानंतर मान्सूनने दक्षिण आणि उत्तर भारतात प्रगती केली आहे..;

Update: 2023-06-19 14:01 GMT

 तब्बल सहा दिवस एकाच ठिकाणी मुक्काम करुन समस्त देशवासीयांची चिंता वाढविणारा मान्सून (Monsoon2023)अखेर पुढे सरकला आहे. मान्सूनचे आगमन उशिरा होत असले तरी चिंता करण्याची गरज नाही. २०१९ मधेही उशिरा पावसाचे आमगन होऊन विक्रमी पाऊस पडला होता असं हवामान विभाग (IMD)ने स्पष्ट केलं आहे.

 २३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांची उंचीही वाढत आहे. त्यामुळे मध्य भारतातील बऱ्याचशा भागात मान्सूनचा पाऊस येणार असून त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

मान्सूनने अखेर आज पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. एकाच जागेवर तब्बल सहा दिवस मुक्काम केल्यानंतर मान्सूनने दक्षिण आणि उत्तर भारतात प्रगती केली. तर बिपरजॉय(Biperjoy) चक्रीवादळ निवळले असून ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात चांगला पाऊस असेल, अशी माहिती पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. या काळात देशासाठी चांगली स्थिती निर्माण होईल, असेही ते म्हणाले. सध्या पावसाची सरासरी ही मोठ्या प्रमाणावर तुटीची आहे. त्यामुळे पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल, असेही होसाळीकर यांनी सांगितले.


 


मान्सून उशिरा पण चिंता नको...

``एकाच जागेवर तब्बल सहा दिवस ठाण मांडून असलेल्या मान्सूनने आज पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. बिपरजॉय चक्रीवादळ निवळल्यानंतर मान्सूनची रखडलेली वाटचाल पुन्हा सुरु झाली. मान्सून लांबल्याने अनेक शेतकरी व्यापारी आणि नागरीकांच्या मनामधे संभ्रम निर्माण झाला आहे. मान्सून उशिरा येण्याचा प्रकार फक्त याच वर्षी झालेला नाही.

वर्ष २०१९ मधेही अशाच पध्दतीने मान्सूनचे आगमन उशिरा झाले होते. परंतू त्यानंतरही २०१९ वर्षात पध्दतीने मान्सून उशिरा आला होता. परंतू त्यावेळी गेल्या २३ वर्षात झाला नाही इतका सरासरी (११५%) पाऊस पडला होता. सप्टेबर-२०१९ वर्षातील पावसाची सरासरी (१५२%) इतकी सर्वाधिक होती. गेल्या १०२ वर्षाच्या मान्सूनच्या इतिहासामधे हे पर्जन्यदुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक होते. २०१० नंतर जुलै ते सप्टेंबर २०१९ मधे झालेला पाऊस सरासरीपेक्षा सर्वाधिक होता हे विशेष``... असं सांगत भारतीय हवामान विभागाचे उपमहाप्रबंधक कृष्णानंद होसाळीकर यांनी २०१९ च्या पावसाची आकडेवारी मांडली आहे.

मान्सूनची वाटचाल सुरु झाली असानाच मान्सूनने आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तसचे बंगालच्या उपसागरच्या काही भागांमध्ये प्रगती केली. त्याचबरोबर पश्चिम बंगालचा दक्षिण भाग, झारखंडचा काही भागात मान्सूनने प्रगती केली.

शेतकरीही पावसाच्या आगमनाची वाट पाहत असल्याने पावसाची आकडेवारी, पावसाचे पूर्वानुमान पाहून पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पेरणीसाठी घाई करू नये, असाही सल्ला देण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या भागामध्ये ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणीयोग्य वातावरण निर्माण होते. मात्र या आकडेवारीसोबतच स्थानिक जमिनीचा कसही लक्षात घेऊन पेरणी करावी, असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.




 


मान्सूनची सिमा रत्नागिरी, कर्नाटकचा रायचूर, कावली, कॅनिंग, श्रीनिकेतन, डूमका भागात आहे, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.

मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सून पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये दक्षिण द्वीपकल्पचा आणखी काही भाग, ओरिसाचा काही भाग, पश्चिम बंगाल तसेच झारखंडचा काही भागात भागात प्रगती करु शकतो.

वाटचाल सुरु झाली असानाच मान्सूनने आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तसचे बंगालच्या उपसागरच्या काही भागांमध्ये प्रगती केली. त्याचबरोबर पश्चिम बंगालचा दक्षिण भाग, झारखंडचा काहीभागात माॅन्सूनने प्रगती केली. मान्सूनची सिमा रत्नागिरी, कर्नाटकचा रायचूर, कावली, कॅनिंग, श्रीनिकेतन, डूमका भागात आहे, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) दिला.

मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

मान्सून पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये दक्षिण द्वीपकल्पचा आणखी काही भाग, ओरिसाचा काही भाग, पश्चिम बंगाल तसेच झारखंडचा काही भागात भागात प्रगती करु शकतो.

तसेच बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या काही भागात मान्सूनची प्रगती होणार आहे, असे हवामान विभागाने (IMD)म्हटले आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाची प्रणाली आता निवळली आहे. ईशान्य राजस्थान आणि परिसरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील २४ तासांमध्ये ते पुर्वेकडे सरण्याची शक्यता आहे.

तमिळनाडूच्या किनारपट्टीलगत १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्या पासून केरळच्या किनारपट्टीलगत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. हा कमी दाबावाचा पट्टा ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. 2019 मध्ये तयार झालेली परिस्थिती यंदा दिसत असून मान्सूनचे आगमन उशिरा झाले तरी चिंता करण्याची गरज नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केला आहे.

Tags:    

Similar News