Monsoon2023 राज्यभर पावसाचे कमबॅक
सप्टेंबर महिन्यात हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या यलो अलर्ट दिला आहे...;
देशात मान्सूनवर यंदा अल निनोच्या प्रभावामुळे तुटवडा दिसून आल्यानं खरीप संकटात असताना कोरड्या जून आणि ऑगस्ट महिन्यानंतर जुलै महिन्यात काहीसा दिलासा मिळाला असताना आता सप्टेंबर महिन्यात हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या यलो अलर्ट दिला आहे.हवामान अभ्यासक शेतकरी विजय जायभाये यांनी वर्तवलेला विभागीय अंदाज..
1
दुष्काळी पट्ट्यात जीवनदान
``पुढील दोन आठवडे मान्सून सक्रिय राहणार असल्यामुळे राज्यात काही भागात चांगला पाऊस होईल दुष्काळी पट्टा पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर बीड धराशिव लातूर नांदेड सह मराठवाडा पुढील दोन दिवस पाऊस वाढेल.
2
तुट भरणे अशक्य पण...
`` 5/6 सप्टेंबर पासून विदर्भ विभागात पाऊस जोरदार राहील 7/8/9 सप्टेंबर कमी दाबाचा पट्टा सक्रिय राहून उत्तरे महाराष्ट्र विदर्भ या भागात काही ठिकाणी पाऊस पडेल त्या नंतर पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन 12/13/14 सप्टेंबर राज्यात पाऊस पडेल.राज्यातील पावसाची तूट मात्र भरणे शक्य नसले तरी जीवनदान देणारा पाऊस पुढील काळात होईल.``
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
3
मान्सून माघारी फिरणार...
दक्षिण पश्चिम मान्सून चा काळ पुढील 20 दिवसात संपणार असून 18ते 20 सप्टेंबर जवळपास मान्सून राजस्थान मधून माघारी फिरणार आहे.या काळात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन आणि iod पॉजिटीव्ह फेज मध्ये गेला असल्यामुळे तसेच mjo त्या काळात 2/3/4 फेज मध्ये येत आहे.
4
परतीच्या पावसाची शक्यता
``दक्षिण भारतात पाऊस देतील याच काळात राज्यात परतीचा पाऊस काही भागात पडेल काही भागात पाऊस कमीच राहील ऑक्टोबर मध्ये काही भागात पावसाची शक्यता राहील. तो पाऊस सार्वत्रिक नसेल.``
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
5
मोठा पाऊस नाही..
उत्तर महाराष्ट्र 2 सप्टेंबर
``जळगाव धुळे नंदुरबार काही भागात मध्यम पाऊस होईल. नाशिक अहमदनगर भागात भागात मध्यम वळीव पाऊस होईल. इतर ठिकाणी सर्वत्र ढगाळ हवामान किरकोळ पाऊस होईल. संभाजीनगर किरकोळ भागात मध्यम पाऊस होईल. 6/7/8 किरकोळ भागात मध्यम पाऊस होईल. खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही.11ते 18 सप्टेंबर काही भागात पावसाचा जोर राहील.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
6
कोकणात जोरदार पाऊस
कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात अधून मधून जोरदार पाऊस होईल..
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
7
मध्य महाराष्ट्रात जोरदार आणि मध्यम
मध्य महाराष्ट्र 2 सप्टेंबर
पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली 2/3 सप्टेंबर काही भागात जोरदार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल पुढील आठवड्यात 10 सप्टेंबर पासून पुढील काही दिवस पाऊस पडेल.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
8
मराठवाड्यातही पाऊस
मराठवाडा 2 सप्टेंबर
``पुढील दोन दिवस पूर्व मराठवाड्यात लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, धराशिव काही भागात जोरदार वळीव पाऊस तर काही भागात मध्यम पाऊस होईल. पुढील आठवड्यात देखील पाऊस सक्रिय राहील.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
9
विदर्भात पावसाची शक्यता..
विदर्भ 2 सप्टेंबर
आज पूर्व विदर्भ नागपूर गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती वाशीम बुलढाना अकोला मध्यम पाऊस होईल 1/2/3 सप्टेंबर मध्यम पाऊस होईल 5/6/7/8 सप्टेंबर काही भागात पाऊस होईल त्या नंतर 11ते 17 सप्टेंबर पाऊस चांगला राहील.