#Monsoon2023 मॉन्सून अखेर महाराष्ट्रात दाखल

मॉन्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल तळ कोकणातील रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या काही भागात मजल;

Update: 2023-06-11 09:25 GMT

शेती उद्योग आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा अर्थव्यु असलेल्या मान्सूनचे आज महाराष्ट्रात दमदार आगमन झाले आहे. राज्यातील तळ कोकणातील रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या काही भागात मान्सूनने मजल मारल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतपणे जाहीर केलं आहे. लवरकरच महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनचे आगमन होईल अशी आता अपेक्षा आहे.

: नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनची वाटचाल सुरूच आहे. रविवारी (ता. ११) मॉन्सून कोकणात दाखल झाल्याचे हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं आहे. पुढील दोन दिवसात मॉन्सून महाराष्ट्राच्या उर्वरित काही भागात मजल मारेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे


मान्सून  महाराष्ट्रात पोचला पहा हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण..

Full View

https://www.maxmaharashtra.com/max-kissan/monsoon-2023-finally-arrived-in-kerala-1224619

केरळनंतर (Kerla) आज मान्सून महाराष्ट्रात (Monsoon) दाखल झाला आहे. आज ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आज ही माहिती दिली आहे. (Monsoon Arrives In Maharashtra)



राज्यातील शेतकरीही चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. मान्सूच्या आगमनाची वार्ता ऐकताच सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. केरळात 8 जून रोजी मान्सून धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सगळ्या शक्यतांवर मात करत मान्सून आज ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

काय आहे यंदाचा मॉन्सून२०२३ हवामानतज्ञ माणिकराव खुळे

Full View

देशात दाखल होण्यासाठी माॅन्सूनने यंदा आठ दिवस उशीर केला. माॅन्सूनच्या केरळ आगमनाची सर्वसाधारण तारीख एक जून असते. त्यानंतर दरवर्षी सर्वसाधारण ७ जूनला मॉन्सून तळकोकणात दाखल होतो.

परंतु यंदा मॉन्सून केरळमध्ये ८ जूनला दाखल झाला. त्यामुळे केरळात ८ दिवस उशिरा पोचला तर सर्वसाधारण तारखेच्या ५ दिवस उशिरानं मॉन्सून कोकणात दाखल झाला.

रविवारी मॉन्सूननं अरबी समुद्र, कर्नाटकचा काही भाग, गोवा, कोकणाचा काही भाग, तामिळनाडू आणि पुड्डेचेरीचा बहुतांश भाग, आंध्रप्रदेशाचा काही भाग, पश्चिममध्य आणि नैऋत्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, ईशान्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे




Tags:    

Similar News