राज्यात मान्सूनचे पुनरागमन
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने येत्या ४८ तासांत राज्यात मान्सूनचे पुनरागमन होणार आहे.;
IMD च्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमच्या निरीक्षणानुसार ही प्रणाली बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्चिम भागात तयार होण्याची शक्यता आहे. हे राज्यासाठी एक सकारात्मक संकेत आहे. येत्या दोन दिवसांत मान्सूनचे पुनरागमन होण्याची आम्हाला अपेक्षा आहे".
आयएमडीने गेल्या तीन दिवसांत घाट परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद केली आहे. ८ सप्टेंबरपर्यंत शहरात हलक्या पावसाचा अंदाज अधिकाऱ्यांनी आधीच वर्तवला आहे.
IMD ने मराठवाडा विभागासाठी ४ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे. या प्रदेशात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे विदर्भात ४ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रत्यक्षात, रविवारी काही ठिकाणी पावसाचं पुनरागमन झालं आहे. वर्धा येथे ५१ मिमी, नागपूर ४५ मिमी, चंद्रपूर २७ मिमी, ब्रह्मपुरी १० मिमी, बुलडाणा ८ मिमी आणि गोंदियामध्ये ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
प्रगतिशील शेतकरी आणि हवामान अभ्यासाक
विजय जायभावे हवामान अंदाज
ता. सिन्नर जि. नाशिक दि.4 सप्टेंबर 2023
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈⛈️⛈️⛈⛈️
1.
कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव
पुढील 24 तासात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचा प्रवास उत्तर पश्चिम दिशेने सुरू होईल. याचा जास्त परिणाम मध्य भारतात होईल मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ,मराठवाडा या भागात 6/7/8 सप्टेंबर रोजी काही भागात मुसळधार तर काही भागात जोरदार ते मध्यम पाऊस होईल.
2.
राज्यात सर्वदूर पाऊस नाही
राज्यात इतर ठिकाणी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात सार्वत्रिक पाऊस नाही. 7/8/9 सप्टेंबर नाशिक,धुळे, नंदुरबार,अहमदनगर, संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली मध्यम स्वरूपात पाऊस होईल.
3.
काही भागात जोरदार पाऊस
पुढील आठवड्यात 12/13 सप्टेंबर आणि 15/16/17 सप्टेंबर या काळात देखिल काही भागात जोरादर पाऊस राहील मात्र काही भागात पावसाचे प्रमाण कमीच राहील.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
4.
तीन आठवडे कमी दाबाचे पट्टे
हिंदी महासागरावर IOD पॉझिटिव्ह परिस्थिती मध्ये आला असून MJO देखिल 3/4/5 फेज मध्ये सक्रिय झाला असून याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागराव कमी दाबाचे पट्टे पुढील दोन तीन आठवडे सतत निर्माण होतील.
मान्सून माघाराची प्रक्रिया
5.
"20/22 सप्टेंबर नंत्तर मान्सून राजस्थान मधून माघारी फिरण्याची शक्यता आहे परतीचा पाऊस राज्यात काही भागात होईल काही भागात कमी प्रमाणात राहील".
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
6
उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर
उत्तर महाराष्ट्र 4 सप्टेंबर
जळगाव धुळे नंदुरबार काही भागात मध्यम पाऊस होईल नाशिक,अहमदनगर भागात भागात मध्यम पाऊस होईल इतर ठिकाणी सर्वत्र ढगाळ हवामान किरकोळ पाऊस होईल. संभाजी नगर किरकोळ भागात मध्यम पाऊस होईल 6/7/8 किरकोळ भागात मध्यम पाऊस होईल खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही 11ते 18 सप्टेंबर काही भागात पावसाचा जोर राहील.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
7.
कोकणात जोरदार सरी
कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात अधून मधून जोरदार पाऊस होईल .
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
8
मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र 4 सप्टेंबर
पुणे,सातारा,कोल्हापूर,सोलापूर,सांगली 4/5 सप्टेंबर काही भागात मध्यम पावसाची शक्यता तर काही ठिकाणी हलका पाऊस होईल पुढील आठवड्यात 12/13/14 सप्टेंबर पासून पुढील काही दिवस पाऊस पडेल.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
9
मराठवाड्यात मध्यम पाऊस
मराठवाडा 4 सप्टेंबर
पुढील दोन दिवस4/5 पूर्व मराठवाड्यात लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, धराशिव काही भागात जोरदार वळीव पाऊस तर काही भागात मध्यम पाऊस होईल 7/8 सप्टेंबर देखील पाऊस जोरदार राहील.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
10
विदर्भात जोरदार पाऊस
विदर्भ 4 सप्टेंबर
आज पूर्व विदर्भ नागपूर,गोंदिया, वर्धा यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली,अमरावती, वाशीम, बुलढाना, अकोला मध्यम पाऊस होईल 4 सप्टेंबर मध्यम ते जोरदार पाऊस होईल 5/6/7/8 सप्टेंबर काही भागात मुसळधार पाऊस होईल त्या नंतर 11ते 17 सप्टेंबर पाऊस चांगला राहील.