नाफेडचा चना खरेदी बंदचा आदेश; आमदार यशोमती ठाकूर संतापल्या...

एकीकडे शेतकऱ्यांच्या (Farmer) घरात चना पडून असतांना दुसरीकडे मात्र नाफेड (Nafed)चना खरेदी बंद करण्याचे आदेश देतात. त्यामुळे या ईडी (ED)सरकारचं हे चाललय काय? असा संतप्त सवाल करुन चना खरेदी बंद केल्यास तिव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा आमदार ॲड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांनी दिला.;

Update: 2023-04-17 14:45 GMT


 एकीकडे शेतकऱ्यांच्या घरात चना पडून असतांना दुसरीकडे मात्र नाफेड चना खरेदी बंद करण्याचे आदेश देतात. त्यामुळे या ईडी सरकारचं हे चाललय काय? असा संतप्त सवाल करुन चना खरेदी बंद केल्यास तिव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला. त्यांनी आज तिवसा खरेदी-विक्री ला भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला त्यावेळी त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली.

नाफेडच्या वतीने शेतकऱ्यांचा चना खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्या पृष्ठभूमिवर नाफेडने चना खरेदी करावी अशी मागणी ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यानंतर चना खरेदी सुरु झाली मात्र नुकताच नाफेडचे कार्यकारी संचालक यांचा चना खरेदी बंद करण्याचा आदेश तिवसा खरेदी-विक्रीला प्राप्त झाला होता. त्यापृष्ठभूमिवर आज 16 एप्रिल रोजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे भेट दिली त्यावेळी त्यांनी भ्रमणध्वनीवरुन नाफेडच्या संबंधित अधिकाऱ्यांना चना खरेदी करण्याचे आदेश दिले. तसेच त्या म्हणाल्या की, अनेक शेतकऱ्यांच्या घरी चना अजूनही पडून आहे. मात्र नाफेडने चना खरेदी बंद केली तर त्याची विक्री कुठे करायची असा सवाल करुन त्या म्हणाल्या की, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. सरकार इतर कामांवर कोट्यावधी रुपये खर्च करतय मात्र चना खरेदी बंद करण्याचे तोंडी आदेश देतय हा कोणता न्याय आहे. असा सवाल करुन त्या म्हणाल्या की, सरकारची ही पद्धत शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असून जर नाफेडने चना खरेदी केली नाही तर याविरोधात तिव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Tags:    

Similar News