मेथी आणि कोथिंबीरीचे भाव गगनाला भिडले
आवक कमी झाल्यामुळे भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले;
नवी मुंबईतील एपीएमसी भाजी मार्केटमध्ये मेथी व कोथिंबीरीचे भाव काही दिवसांपूर्वी कमी होते. मात्र सध्या मेथी आणि कोथिंबीरीचे दर वाढले आहेत. कोथिंबीरची एक जुडी 40 ते 50 रुपयाला तर मेथीची एक जुडी 25 ते 30 रुपयाला मिळत आहे. सणासुदीच्या काळात मेथी आणि कोथिंबीर चे भाव वाढल्यामुळे ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. येणाऱ्या काळातही दर वाढण्याची शक्यता आहे. वातावरणातील होणारा बदल पाऊस आणि मध्येच ऊन यामुळे भाज्या लवकर खराब होतात, त्यात आवक कमी झाल्यामुळे भाव वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.