तुरीमध्ये होते झेंडूची आंतर लागवड
चोपडा तालुक्यात तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केल्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ
कधी पाऊस कमी तर कधी जास्त प्रमाणात पाऊस होत असल्याने शेतातील पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. पिकासाठी लागलेला खर्च देखील निघत नाही. चोपडा तालुक्यातील युवा शेतकऱ्याने तुरीची लागवड केली आहे आणि त्यामध्ये झेंडूची देखील लागवड केली आहे. आंतरपीक म्हणून तूर निघेल तोपर्यंत झेंडूच्या फुलांची विक्री होऊन ते उत्पन्न तुरीच्या शेतीला लागलेला खर्चामध्ये मिळाले आहे. सध्या नवरात्र सुरू आहे त्यामुळे झेंडूच्या फुलांना मागणी असल्याने झेंडूच्या फुलांना बऱ्यापैकी किंमत मिळत आहे. शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता अंतर पीक घेतलं तर होणार जे नुकसान आहे ते टाळता येऊ शकते असे युवा शेतकरी प्रशांत सोनी यांनी सांगितले.