उन्हाचा झेंडू उत्पादक शेतकऱ्याला फटका, दसऱ्या सणाच्या तोंडावर उत्पादनात घट
दसऱ्या सणाला झेंडूच्या फुलातून उत्पन्न मिळेल या आशाने येवला तालुक्यातील एरंडगाव शिवारातील संदीप जेऊघाले या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये झेंडूचे पीक घेतले. मात्र पावसाअभावी झेंडू झाडांची वाढ खुंटल्याने फुलाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कडक उन्हामुळे फुल देखील खराब झाल्याने या फुलांना 40 ते 45 रुपये किलो भाव मिळत असल्याने या फुल उत्पादक शेतकऱ्याला ऐन दसरा सणाच्या तोंडावर फटका बसला असून आता फुल उत्पादक शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडताना दिसत आहे.