झेंडूची शेती ठरली 'सेल्फी पॉइंट'
झेंडूच्या शेतात फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी ; शेतकऱ्याला होतोय चांगलाच फायदा;
नांदेड शहरापासून काही अंतरावर माता रत्नेश्वरी देवीचे मंदिर आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक भक्त मंदिराकडे येत आहेत. याच रस्त्यावर झरी गावापासून काही अंतरावर श्यामराव गिरे यांची फुल शेती आहे. या शेतात त्यांनी दीड एकर मध्ये झेंडू आणि सुर्यफुल लावले आहेत. हि पिके सध्या बहरात असल्याने मंदिराकडे येणारे भाविक मोठ्या प्रमाणात या रंगीबेरंगी बागेत फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत. यासाठी शेतकरी एका व्यक्तीकडून दहा रूपये घेत आहे. पैसे देवून देखील येथे सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यातून शेतकऱ्याला चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे गिरे यांची शेती सद्या सेल्फीचे ठिकाण ठरली आहे.
: