मोसंबीत झेंडूचे आंतरपीक
मोसंबीच्या पिकात आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड, झेंडूच्या फुले काढणीला सुरुवात...
चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सात एकर शेतात मोसंबीची लागवड केली आहे. त्यापैकी चार एकर मध्ये झेंडूची लागवड आंतरपीक म्हणून केली आहे. आता झेंडूची फुले काढणीला सुरूवात झाली आहे. फुलांचा भाव स्थिर नाही आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये उत्सवाला सुरुवात होणार असल्याने फुलांची मागणी वाढेल आणि फुलांच्या दरात देखील वाढ होईल. आतापर्यंत जास्त उत्पन्न झाले नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये उत्सवात मागणी वाढेल आणि उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी गोपाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.