मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे भाव द्या ; शेतकऱ्यांची मागणी
उद्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या, मुख्यमंत्र्यांच्या (EknathShinde) गाड्यांचा ताफा अडवणार असल्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने (farmers)दिला आहे. मराठवाड्यात ऊस आणि कापूस उत्पादक शेतकरी अडचणींचा सामना करत आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार असल्याचं शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे यांनी सांगितले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील चांगला भाव मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान शेतकरी संघर्ष समितीला इतर संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.