हिवाळ्याच्या शेवटीपासून आंब्याच्या झाडांना मोहर यायला सुरुवात होते. यंदा अनेक झाडांना मोहर चांगला आला असून, काही झाडांना मोहोर कमी प्रमाणात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नेमकी आंब्याच्या झाडांची कशी काळजी घ्यावी, या संदर्भात फळ संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. याचा उपयोग करून शेतकरी चांगलं उत्पन्न मिळू शकतात.
उन्हाळ्याला सुरुवात झाली की प्रत्येकाला वेध लागतात ते आंब्याचे...आंब्याच्या झाडांना आता मोहर यायला सुरुवात झाली आहे. वातावरणाच्या बदलामुळे काही झाडांना मोहर लवकर आला आहे. तर काही झाडांना मोहर उशिरा येत आहेत. वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घेणे मात्र गरजेचे आहे, असे कृषीतज्ञ सांगतात. दिवसेंदिवस वाढत असलेली उष्णता आंब्याच्या झाडांसाठी धोकादायक आहे. यामुळे झाडांची फळ कमी होऊ शकतात. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांना माहिती दिलीअसल्याने फळ संशोधन केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना भविष्यात झाडांना आंबे टिकून ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. यासाठी नेमकी कशी काळजी घ्यावी, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांनी वाढत्या उष्णतेसाठी आंब्याच्या झाडांना चांगले सिंचन देणे गरजेचे आहे. यामुळे झाडांची गळती रोखता येऊ शकते. मोहर लागलेल्या झाडांना त्यांच्यावर पडलेल्या किड्यांपासून संरक्षण करण्याची गरज आहे. शेतकरी हायर मॉलिक्युल्स म्हणजे नवीन औषधांचा वापर करत असतात. मात्र या औषधांमुळे परंपरागत संचार करणाऱ्या मधमाशांना या औषधामुळे प्रतिबंध होऊ शकतो. यामुळे झाडाचे नुकसान होऊ शकते. झाडांसाठी कडुलिंब व लिंबोल्यांचा वापर करू शकतो. यामुळे आंब्याच्या झाडाचे नुकसान होणार नाही. असे मत कृषीतज्ञांनी व्यक्त केले आहे.