मलेशियन रिटेल बाजार अन् ग्राहक भारतीय कांद्याची वाट पाहताहेत...
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे कांदा उत्पादकांना फटका बसत असताना रंग, चव, आकार आणि स्वादाच्या बळावर परदेशी मार्केटात पहिली पसंती भारतीय कांदा मिळवत असल्याने मलेशियात मोठी मागणी वाढल्याचे विश्लेषण केले आहे कृषी अभ्यासक दीपक चव्हाण यांनी...;
मलेशिया दरवर्षी सुमारे पाच लाख टन कांदा आयात करतो. आयातीत मालात इथल्या ग्राहकांची पहिली पसंती भारतीय कांद्यास असते.इथली हॉटेल्स देखिल भारतीय कांद्यालाच पसंती देतात. भारताने निर्यात बंद केली की पाकिस्तान, चीन, न्यूझीलॅंड, नेदरलॅंड आदी देशांना वाव मिळतो.
एकूणच आग्नेय आशियायी देशांच्या आहारशैलीत भारतीय कांदा एकदम फीट बसतो.गेल्या वर्षी भारताने कांदा निर्यातबंदी केल्याने अन्य स्पर्धक देशांना वाव मिळाला हे खरे, पण उपलब्धता वाढताच मलेशियन ग्राहक
पुन्हा भारतीय कांद्याकडे वळतील. जानेवारीत निर्यात सुरू होती, पण अन्य देशांच्या तुलनेत भारतीय कांदा उंच रेटने उपलब्ध होता. त्यामुळे म्हणावा तेवढा उठाव नव्हता. फेब्रुवारीपासून भारतीय कांद्याची भाव पडतळ अन्य स्पर्धक देशांच्या तुलनेत स्पर्धाक्षम होईल. पर्यायाने खप वाढेल.
केंद्र सरकारने व्यापारात कितीही अडथळे आणले तरी भारतीय कांदा आपल्या रंग, चव, आकार आणि स्वादाच्या बळावर परदेशी मार्केटात पहिली पसंती मिळवतोय. गुणवत्तेच्या बळावर टिकून राहतो.
- दीपक चव्हाण