मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, मका उत्पादक अडचणीत
सोयाबीन ( Soyabean)पिकानंतर आता येवला तालुक्यात सायगाव येथे मका (Corn)पिकावर लष्करी अळीचा ( army worm)प्रादुर्भाव होऊ लागला आहे. मोठ्या प्रमाणात ही अळी पिकांची नासाडी करीत आहे.
येवला तालुक्यातील सायगाव येथील सुनील देशमुख या शेतकऱ्याने जेमतेम पावसावर दहा एकर क्षेत्रामध्ये मक्याचे पीक घेतले. मक्याचे पीक आले देखील. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मका पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने अक्षरशः आता केलेला उत्पादन खर्च देखील वाया जातो की काय असा मोठा प्रश्न या मका उत्पादक शेतकऱ्याला पडला आहे. तरी या मक्यावर शासनाने योग्य मार्गदर्शन करून भरपाई देखील द्यावी, अशी मागणी आता येथील मका उत्पादक शेतकरी सुनील देशमुख बाळू निघोट यांनी केली आहे...