Monsoon महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट; या भागात अतिवृष्टी होणार..

हवामान खात्याच्या (IMD) अंदानुसार, पुढच्या २४ तासांमध्ये नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल होणार आहे;

Update: 2023-06-27 00:42 GMT


अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता...


मराठवाड्यामध्येदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, २९ आणि ३० जूनला महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल. पण यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.ओडिसावरील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील २४ तासांत कायम राहील. त्याच्या प्रभावाखाली, ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे," भुवनेश्वर हवामान खात्याचे प्रादेशिक संचालक हबीबुर रहमान बिस्वास यांनी सांगितले.

62 वर्षात पहिल्यांदाच मान्सून दिल्ली आणि मुंबईत एकाच दिवशी दाखल झाला. मुंबईसाठी मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 11 जून आणि दिल्लीसाठी 27 जून आहे, परंतु या वर्षी, पावसाच्या ढगांनी अनेक पश्चिमेकडील राज्यांपेक्षा देश व्यापून टाकण्यासाठी एक वेगळा मार्ग निवडला आहे.

“मान्सूनने दिल्ली आणि मुंबई दोन्ही एकाच वेळी 21 जून, 1961 रोजी कव्हर केले होते. त्या वर्षी, मान्सूनने त्याच दिवशी देशातील उर्वरित भाग व्यापले होते,” असे आयएमडीच्या अधिकाऱ्यानी रविवारी सांगितले.

नैऋत्य मोसमी पावसाने गेल्या काही दिवसांत संततधार पाऊस पाडल्यानंतर देशातील अनेक भागात पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळपासून चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर (NH-21) मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने शेकडो पर्यटक अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे अचानक पूर येण्याच्या धोक्यामुळे अधिकाऱ्यांनी रामबनमधील 10 वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद केल्या.

"हिमाचल प्रदेशात दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सततच्या पावसापासून दिलासा मिळणार नाही. पुढील ४-५ दिवस मान्सूनचा पाऊस सुरू राहील," असे हिमाचल प्रदेश हवामान विभागाचे संचालक सुरेंद्र पॉल यांनी सांगितले.

धीरज 24 तासात मुंबई आणि उपनगर तसेच कोकणपट्टी मध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. आणि भागात पाणी देखील साचले आहे.

महाराष्ट्राचा किनारपट्टीचा भाग मुंबई रत्नागिरी आणि इतर भागांमध्ये पुढील काही काळामध्ये अति पर्जन्य होणार असून पुढील दोन दिवसात मुसलदार पाऊस पडेल असं भारतीय हवामान विभाग (IMD) हे सांगितले आहे.

बंगालच्या महासागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून गुजरातच्या कच्छ भागांमध्ये वादळी परिस्थिती आहे त्यामुळेच महाराष्ट्राने कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस होत आहे.

भारतीय हवामान विभागाने रायगड रत्नागिरी पालघर मुंबई ठाणे आणि सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पावसाबरोबरच ऑरेंज अलर्ट दिला आहे.

यंदा महाराष्ट्राचं मुख्यद्वार असलेला मान्सून मुंबईतच तब्बल 14 दिवस उशिरा आला होता तो दिल्लीमध्ये दोन दिवस आधीच येऊन पोहोचला. Q 1961 ते 2019 या वर्षातील नोंदीनुसार मुंबईमध्ये मान्सून आगमनाची तारीख 11 जून असून दिल्लीमध्ये मान्सून 27 जूनला पोहोचतो. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदा पहिल्यांदाच मान्सूनने कमी वेळामध्ये पूर्ण देश व्यापला आहे. गेल्या 62 वर्षांमध्ये मुंबई आणि दिल्लीमध्ये एकाच वेळी मान्सून पोहोचल्याची भारतीय हवामान विभागाला घोषणा करावा लागल्याची ही दुर्मिळ घटना आहे.

हवामान खात्याच्या अंदानुसार (IMD) पुढच्या २४ तासांमध्ये नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्येदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आगे. दरम्यान, २९ आणि ३० जूनला महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल. पण यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

विदर्भामध्ये ही अमरावती भंडारा गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अकोला नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगटासह मध्यम स्वरूपाचा ठिकठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.


Tags:    

Similar News