काही रुपयांत लाखोंचे नुकसान वाचवणारी टेक्निक

शेतकरी मित्रांनो तुम्हाला असंख्य शत्रू आहेत.. परंतु संकट येण्याआधीच या शत्रूचा मुकाबला करायचा तर ही टेक्निक नक्की वापरा.. महा कृषी पर्यवेक्षक नारायण घुले यांची तुमचं लाखोंचं नुकसान वाचवणारी जुगाड टेक्निक...;

Update: 2023-06-03 02:30 GMT

हुमणी ,उनी ही कीड ऊस भुईमूग टोमॅटो ह्या खरिपाच्या पिकांमध्ये किती नुकसान करते हे शेतकरी म्हणूनच कळते तिच्या नियंत्रणासाठी दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला फक्त 10 ते 15 दिवस एक साधा ब्लब लावून प्रकाश सापळे तयार केले तर प्रौढ किडे पकडले गेले तर त्यांची पुढची होणारी पिढीच जन्माला येत नाही अशा प्रकारे कीडनियंत्रण करायचे असते ....पहा करा सुरुवात नंतर नको रासायनिक कीटकनाशके शोधायला.

Full View

पावसाळा सुरुवात होत आहे वादळ चक्रीवादळ पण आलेलं आहे पण आता या हंगामात सुरुवातच वादळी होत आहे म्हणून ह्या खरिपात उनी (हुमनी) ची अळी येणार ऊस ,लाल कांदा,व भुईमुग बाजरी या पिकांच्या मुळ्या खाऊन आपले नुकसान करण्यासाठी उनी ही येणारच तसेच मक्यावर उन्हाळ्यात आलेली लष्करी अळी ही परत खरिपात पण येणारच...

म्हणून यावर उपाय काय करायचा म्हणून आता उनी(हुमणी )या पांढरी अळीचा उपाय सांगणार आहे... तुमचा शत्रू फक्त पुढील १५ ते २० दिवस च ह्या सापळ्यात येईल नाहीतर त्यानंतर तुम्ही त्याच्या जाळ्यात वर्षभर......तूम्हाला उनी म्हणजे हुमणी माहीत तर आहे ना पांढरी अळी जी शेणखत किंवा शेतात खुरपायला गेले की जमिनीत पिकाच्या खोडात जमिनीत दिसून येते तसेच उसात मागील ३-४वर्षांपासून नुकसान करत आहे. ती अळी जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल तर फक्त शेतात लिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडाखाली एक मोठा बल्ब २०० चा पिवळा बल्ब जमिनीपासून ३ ते ४ फूट उंचीवर टांगून ठेवा.आणि बरोबर त्या बल्बाखाली एक ३ बाय ३ चा एक फूट खोलीचा खड्डा घेऊन त्यात प्लॅस्टिकचा कागद पसरून घ्या व त्या खड्ड्यात पाणी भरा..तसेच जुन एखादं कीटकनाशक जर असेल तर ते पाण्यात टाका किंवा नसेल तरी चालेल.

मग संध्याकाळी ६ वाजता तो बल्ब चालू करा त्या मोठ्या उजेडाच्या मुळे लाल भुंगे येऊ लागतील व त्या पाण्यात पडतील व मरतील किंवा तुम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी मारून टाकू शकता........


ते भुंगे म्हणजेच उनी आहे..म्हणल तर उनीची आई म्हणा त्याला...कारण हा लाल भुंगा पहिला पाऊस पडला का लिंबावर किंवा बाभळी च्या पाल्यावर खाऊन जगतो आणि जमिनीत अंडी घालतो.त्या अंड्यातून अळी येते ती अळी म्हणजे उनी...

हा बल्ब लावला तर कमी खर्चात हे भुंगे गोळा करून ते मारून टाकने म्हणजे उनी जन्मालाच येणार नाही..म्हणून आपल्याला विनंती की एकदम कमी खर्चात फक्त पाऊस सुरू झाल्यावर पहिले १५ दिवस एवढं करा तुम्हाला उनी चा प्रश्नच राहणार नाही....,.........मग एक तरी असा प्रयोग घरी करा...



 


चार अवस्था - अंडी, अळी, कोष आणि प्रौढ भुंगेरे.

यातील अळी आणि प्रौढ भुंगेरे या दोन अवस्था पिकांच्या दृष्टीने हानिकारक असतात.

या किडीचे भुंगेरे तपकिरी रंगाचे असून जमिनीमध्ये सुप्तावस्थेत असतात. साधारणपणे मे अखेरीस मोसमी पावसाला सुरुवात झाल्याबरोबर हे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडायला सुरुवात होते. जून- जुलै महिन्यांत सर्वांत जास्त भुंगेरे बाहेर पडतात. भुंगेऱ्याचा जीवनकाळ २० ते ३० दिवसांचा असतो.

रात्री लिंब, बाभूळ किंवा बोर अशा झाडांवर भुंगेरे गोळा होतात. या काळात नर-मादीचे मिलन होते.

एक मादी जमिनीत ओलाव्याला ५ ते १५ सेंमी खोलीवर सुमारे ५० अंडी देते. (अंडी अवस्था -१७ ते ३५ दिवस.)

अंड्यातून अळी बाहेर पडते. या अळीचा रंग गढूळ पांढरा असतो. अळी अवस्था ५ ते ८ महिन्यांपर्यंत असू शकते. प्रामुख्याने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत शेतात अळ्या दिसायला लागतात. जानेवारीपर्यंत त्यांची अळी अवस्था पूर्ण होते. पूर्ण वाढलेली अळी ३० ते ४० मि.मी. लांब असते.

पूर्ण वाढलेली हुमणी अळी खाणे थांबवते. जमिनीतच ओलाव्याची जागा बघून कोषामध्ये (म्हणजेच सुप्तावस्थेत) जाते. स्वत:भोवती मातीपासून कोष बनवते. (कोष कालावधी ः २५ ते ४० दिवस)

काही जातींमध्ये कोषातून भुंगेरे बाहेर पडून तसेच जमिनीत पडून राहतात. मोसमी पावसाच्या आगमनाबरोबर भुंगेरे जमिनीच्या बाहेर पडतात. पुन्हा नवीन जीवनसाखळीला सुरुवात होते. वर्षभरात या किडींची फक्त एकच पिढी तयार होते.



 

नुकसानीचा प्रकार या किडीची अळी उसाबरोबरच भुईमूग, बाजरी, ज्वारी तसेच फळे आणि भाजीपाला पिकांना खूप उपद्रव पोहोचविते. अळीचा कालावधी ५ ते ८ महिन्यांचा असतो. अळी पिकांची मुळे कुरतडून किंवा खाऊन टाकते. परिणामी, रोपांना अन्न आणि पाणी मिळत नाही. पाने पिवळी पडून कालांतराने संपूर्ण झाड किंवा बेट वाळून जाते. जास्त प्रादुर्भाव झालेल्या उसाचे बेट उपटले असता सहजपणे उपटून येते. पिकाचे मोठे नुकसान होते. अळीप्रमाणेच प्रौढ भुंगेरेही पिकाला हानिकारक ठरतात. ते पिकाची पाने अर्धचंद्राकृती कुरतडतात. एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन जमिनीच्या आतमध्ये बहुतांश वास्तव्य आणि गुंतागुंती जीवनसाखळी यामुळे या किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. त्यामुळे कोणत्याही एका पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा वापर करावा.



असे बरेच वेगवेगळं सुरुवात केलीय तुम्ही पण केली नसेल तर लगेच करा. ...कारण तुमचा शत्रू फक्त पुढील १५ ते २० दिवस च ह्या सापळ्यात येईल नाहीतर त्यानंतर तुम्ही त्याच्या जाळ्यात वर्षभर..

एकूण खर्च ५० ते १०० रुपये..

पण रिझल्ट मात्र १०० %

Tags:    

Similar News