कर्नाल सचिवालयाबाहेर शेतकऱ्यांचा अनिश्चित काळासाठी ठिय्या, शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश देणाऱ्या शेतकऱ्यांच्या निलंबणावर शेतकरी ठाम;
शेतकऱ्यांचे 'डोकं फोडण्याचे' आदेश देणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून हरियाणा सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झालेली चर्चा अखेर व्यर्थ ठरली आहे. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चा ने कर्नालच्या सचिवालयाला अनिश्चित काळासाठी घेराव घालण्याची घोषणा केली आहे.
चर्चेचा हा दुसरा दिवस होता. बुधवारी झालेली चर्चा निष्फळ ठरली आणि यापूर्वी मंगळवारी झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा समोर आला नव्हता.
काय आहे वाद ?
शेतकरी भाजपच्या सभेला विरोध करत होते. ज्यात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, प्रदेश भाजपा प्रमुख ओम प्रकाश धनखड़ आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी हरियानातील कर्नालकडे जाणारा महामार्ग रोखला होता.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनासंदर्भात कर्नाल जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा, पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांचे डोके फोडण्याची सूचना करताना दिसत आहेत. ते पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत की, कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही किंमतीत मर्यादेच्या पुढे जाण्याची परवानगी देऊ नये, मग त्यांची डोकी फोडावी लागली तरी चालेल.
या व्हिडीओमध्ये आयुष सिन्हा यांना असं बोलताना ऐकू येतं की, "जर मला तिथे एकही आंदोलक दिसला तर मला त्याचं डोकं फुटलेले पाहिजे आणि हात तुटलेले पाहिजे."
त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना निलंबीत करण्याची मागणी केली आहे. सरकारने या अधिकाऱ्याची बदली केली आहे. सिन्हा आता सूचना विभागात एडिशनल सेक्रेट्री म्हणून पद सांभाळत आहे.