केळीचा हॉर्टीकल्चर क्लस्टर योजनेत जळगावचा समावेश करावा- केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे रक्षा खडसेंची मागणी

Update: 2024-06-26 05:55 GMT

राज्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन जळगांव जिल्ह्यात होत असतं. केळी साठी आवश्यक सुपिक जमीन ह्या भागात आहे. केळी लागवडीसाठी जवळ जवळ १ लाख हेक्टर येथे जमीन उपलब्ध आहे. जिल्ह्यातील केळीची अनेक देश-देशात मागणी असल्याने जळगांव जिल्ह्याचा फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम (हॉर्टीकल्चर क्लस्टर)च्या प्रायोगिक टप्प्यात समावेश करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौव्हाण यांच्या कडे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केली आहे, खडसे यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेऊन केळी पिकाविषयी माहिती दिली.

दरम्यान कृषी मंत्री शिवराज सिहं यांच्या भेटी वेळी मंत्री रक्षा खडसे यांनी फळ पिक विम्याचा प्रलंबित लाभ मिळावा याची मागणी केली. पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार सन 2022 मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजपावतो पिक नुकसानी बाबत पिक विम्याचा लाभ प्रलंबित आहेत. पिक विम्याचा लाभ नाकारलेल्या 11022 शेतकऱ्यापैकी 8190 शेतकऱ्यांनी दाद मागितली असता, समितीने पडताळणी करून लाभासाठी पात्र ठरविलेल्या 6686 शेतकऱ्यांना पिक विम्याचा प्रलंबित लाभ मिळावा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

Tags:    

Similar News