जलयुक्त शिवार योजना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी लुटून खाल्ली: आ. संजय गायकवाड
किती सरकारी आले आणि किती सरकारी गेली शेतकरी प्रश्न अजूनही सुटला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली जलयुक्त शिवार योजना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून लुटून खाल्ली. शेती शेतमजुराची मुलं शेतकऱ्याच्या दारातून शिकण्यासाठी नेली पाहिजे. सोयाबीन मका आणि कापूस उद्योगावर प्रक्रिया करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा, अशी मागणी आमदार (बुलढाणा) संजय गायकवाड यांनी विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या वतीने उपस्थित केलेल्या विधानसभा नियम 293 प्रस्तावावर बोलताना सांगितले.